Bride Death in Chhindwara : लग्नापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर नववधूचा मृत्यू, वऱ्हाडावर पसरली शोककळा - Megha Kale death
छिंदवाडा - लग्नाच्या 24 तास अगोदर हातात मेहंदी लावलेल्या नववधूने जगाचा निरोप घेतल्याची ह्रदयद्रावक ( heartbreaking incident at Chhindwara ) घटना समोर आली आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यातील आनंदावर अचानक विरजण पडले आहे. ह्रदय हेलावणारी घटना छिंदवाडा येथे घडली ( bride death during eating Panpuri ) आहे. महाराष्ट्राती पुण्यातून येथे नवरदेवाचे वऱ्हाड आले होते. नववधू मेघा काळे ही पाणीपुरी घात असताना तिला ठसका ( Megha Kale death ) लागला. यावेळी तिला पाणीही देण्यात आले. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. येथे डॉक्टरांनी वधूला मृत घोषित ( Bride Death in Chhindwara ) केले. आशिर्वाद समारोहापूर्वीच नववधुचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST