महाराष्ट्र

maharashtra

Chardham Yatra : भाविकांच्या कारवर कोसळला मोठा दगड, चामोली पोलिसांच्या मदतीने वाचले भाविक

By

Published : May 3, 2023, 7:42 AM IST

मदत करताना पोलीस

चामोली :बद्रीनाथांचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांच्या कारवर दरडीचा दगड कोसळला. त्यामुळे कारमध्ये अडकलेल्या भाविकांसाठी चामोली पोलीस देवदूत बनून आले. या पोलिसांनी भाविकांना कारमधून बाहेर काढून गाझियाबादला सुखरुप पाठवले. त्यामुळे या भाविकांनी चामोली पोलिसांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. बद्रीनाथ महामार्गावरुन भाविक (यूपी 78 इक्यू 9408) बेलोने कारने गाझियाबादकडे जात होते. यावेळी बद्रीनाथ येथून जाणाऱ्या कारवर तैय्या पुलाच्या पुढे पिनोलाजवळ टेकडीवरून मोठा दगड कोसळला. त्यामुळे कारचे पूर्ण नुकसान होऊन भाविक या कारमध्येच अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच गोविंदघाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्रसिंग रावत यांनी तात्काळ फौजफाट्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी भाविकांच्या बेलोनो कारमध्ये अडकलेल्या सनी राजेंद्र पाराशर आणि स्वप्नील सतीश पाराशर या दोन भाविकांची सुखरुप सुटका केली. पोलिसांनी ही गाडी रस्त्याच्या कडेला नेऊन या अडकलेल्या भाविकांवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पोलिसांनी या भाविकांना पुढील प्रवासाला पाठवून दिले. चामोली पोलिसांच्या या मदतीने भाविकांचा जीव वाचला. त्यामुळे चामोली पोलिसांचे कौतुक होत आहे. 

हेही वाचा - Char Dham Yatra: केदारनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी! ३ मे रोजी होणारी यात्राही पुढे ढकलली

ABOUT THE AUTHOR

...view details