दिव्यांगांची आगळीवेगळी राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा; जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डरनं वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Published : Dec 3, 2023, 7:07 AM IST
|Updated : Dec 3, 2023, 10:47 AM IST
अमरावती Bodybuilding Competition For Divyang : आजपर्यंत आपण सर्वसामान्यांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा पाहिल्या असतील. परंतु, अमरावतीमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय दिव्यांगांच्या शरीरसौष्ठव स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रहार जनशक्ती पक्षाच्या भारतीय 'प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघा'नं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यात संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अमरावतीसह वाशिम, नागपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रायगड अकोलासह संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक आले होते. तसंच दिव्यांगांसाठी रक्तदान शिविर, नेत्रदान व आरोग्य तपासणी शिबिर सह अन्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जगातील सर्वात लहान बॉडीबिल्डर होण्याचा मान रायगडच्या प्रतीक मोहिते यांच्या नावावर आहे. प्रतीकची उंची 3.3 फूट आहे. 28 वर्षीय प्रतीकचं नाव 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवलं गेलं आहे. प्रतीक हा एक जिम ट्रेनर आहे. त्याच्या नावावर एक नव्हे तर तब्बल दोन जागतिक रेकॉर्ड आहेत.