Blood stained scarf found In Atiq office : अतिक अहमदच्या कार्यालयात सापडला, फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू - अतीक व अशरफ हत्याकांड
प्रयागराज (उत्तर प्रदेश) :अतिक अहमदचे पाडलेले कार्यालय सोमवारी पुन्हा चर्चेत आले. चकिया परिसरातील करबला येथे असलेल्या या कार्यालयात सकाळी रक्ताने माखलेला पांढरा स्कार्फ आणि बुरखा आढळून आला. याशिवाय कार्यालयाच्या मागील बाजूस जमिनीपासून पायऱ्यांपर्यंत ठिकठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले आहेत. यासोबत भांडीही सापडली आहेत. याची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी जमली. पोलिसांच्या टीमसोबत फॉरेन्सिक टीमही पोहोचली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एसीपी कोतवाली सतेंद्र पी. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातील पायऱ्यांवर आणि खोलीत रक्ताच्या थारोळ्या आढळल्या. फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. याशिवाय जवळपास बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारेही या प्रकरणाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यालयात जाणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.