BJUM progtest against PFI : पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांना भाजयुमोने संबोधले गद्दार, झेंडाही जाळला - पीएफआय समर्थनार्थ आंदोलन पुणे
नागपूर: पीएफआय (पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेच्या समर्थनात (Protest in support of PFI Pune) काल पुणे शहरात झालेल्या आंदोलनात (PFI protest in Pune) 'पाकिस्तान जिंदाबाद'ची घोषणाबाजी (pakisthan Zindabad Sloganism Pune) करण्यात आली होती. त्यानंतर नागपुरात आज भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते नागपुरात आक्रमक (BJUM Nagpur Protest) झाले असून आंदोलकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला (Pakistan flag burning) आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता चौकावर पीएफआय आणि पाठीराख्यांना 'गद्दार' संबोधत आंदोलन केलं. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पीएफआय आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. एनआयएने देशात 97 ठिकाणी छापे मारले आणि त्यामधून पीएफआय कसे देश विघातक गोष्टींमध्ये गुंतला आहे, हे समोर आले आहे. पीएफआयसाठी आंदोलन करणाऱ्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्यामुळे वातावरण तापलं असल्याचं बघायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST