"एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा विरोध भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता", संजय राऊतांचा गौप्यस्फोट - संजय राऊत एकनाथ शिंदे
Published : Dec 11, 2023, 11:00 PM IST
पुणे Sanjay Raut : महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. आता मात्र ते त्यांच्याच हाताखाली काम करत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते सोमवारी (११ डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना, कांदा प्रश्नाबाबत तोडगा निघायला हवा, असं ते म्हणाले. दर वेळेस कांद्यावर निर्यात बंदी केली जाते. यामागे केंद्र सरकारचे काय डाव पेच आहेत हे माहित नाही. देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील, तर यांची धोरणं मध्ये येतात, असं राऊत म्हणाले. तसेच शरद पवार जर याविषयी आंदोलनाला उतरत असतील तर केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, असं यावेळी राऊत म्हणाले.