BJP MLA Ram Satpute पीएफआयकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे, राम सातपुते काय म्हणाले पाहा व्हिडिओ - pakistan zindabad slogan
BJP MLA Ram Satpute पुणे पुण्यासह राज्यभरात एनआयए करून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पीएफआय अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे. यावर भाजप आमदार राम सातपुते BJP MLA Ram Satpute यांनी आपली भूमिका मांडली आहे, ते म्हणाले की ज्यांनी कुणी या घोषणा दिल्या असेल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. पुणे पोलिसांनी Pune Police तात्काळ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे, असे यावेळी सातपुते म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST