Pravin Darekar : उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल; Watch Video - pravin darekar on uddhav thackeray
शिर्डी : उद्धव ठाकरे हताश झाले असून, त्यांची विस्कळीत मानसिकता दिसून आली आहे. मतांच्या लाचारीसाठी उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला. मात्र, त्यांनी उत्तर भारतीयांना कशी वागणूक दिली हे सर्वांनी पाहिले आहे, असा घणाघात आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंवर केला आहे. उद्धव ठाकरे सध्या ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत ते भ्रष्टाचाराचे लक्षण आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंवर केली. साईबाबांच्या दर्शनासाठी प्रवीण दरेकर शिर्डीत आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. स्वत:चा जे ठरवू शकत नाही, ते विधानसभेत 24 जागा कशा जिंकणार, असा सवाल देखील दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही, आत्मविश्वास नाही. त्यामुळे भाजपसोबत लढताना ते निरोधी पक्षनेता ठरवू शकत नसतील, तर त्यांची हतबलता दिसून येते, असे देखील दरेकर म्हणाले. काँग्रेसने विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यात फूट पडेल, असा दावा देखील दरेकर यांनी केला आहे.