Pankaja Munde Video : पंकजा मुंडेंना आता थेट पंतप्रधानपदाचे स्वप्न; म्हणाल्या, एक महिला... - पंकजा मुंडे परळी वक्तव्य
बीड : जिल्ह्यातील परळी मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत कामाच्या उद्घाटनावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान पदावरून मोठे वक्तव्य केले आहे. देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तर तुमची ताई होऊ शकत नाही का?, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. मुंडे यांनी थेट पंतप्रधान पदाविषयी भाष्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे? : भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, एकदा मी शेजारच्या गावात गेले तर तेथील लोक म्हणत होते की, ताई तुम्ही फक्त महिला आहात म्हणून आम्ही तुम्हाला मत दिले नाही. मी विचारले का? तर त्यांनी सांगितले की, महिला विकास करु शकत नाही. एवढे देऊन पण म्हणतात, महिला विकास करु शकत नाही. एवढे तर कुठल्या पुरुषाने दिले नाही. मग माझे काही चुकले आहे का? माझ्यात काही खोट आहे का? माझ्याकडून कोणाचे काही नुकसान झाले का, असेल तर तसेही सांगा. देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तर तुमची लेक नाही होऊ शकत का, असा प्रश्न भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विचारला.