अजून मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी, निश्चितच पंकजाताईंचा पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करतील, भाजप नेते गिरीश महाजन - भाजप नेत्या पंकजा मुंडे
जळगाव येथे भाजप नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना. जळगाव जिल्ह्याच्या विकासासंदर्भात नवीन सरकारच्या चांगल्या योजना असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर हे डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्याचा विकास जोरात होईल. दरम्यान, काल पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना, पक्षाला वाटले असेल मी पदाला योग्य नाही. त्यामुळे मला पद मिळाले नसेल. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, आताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा ताईंना स्थान मिळणार का, तसेच त्यांच्या नाराजीबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत निश्चितच योग्य मार्ग निघेल. ते म्हणाले की, पंकजा ताई पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच गांभीर्याने योग्य विचार करतील. त्या नाराज आहेत, असे आम्हाला वाटत नाही. तसेच मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. त्यामुळे आणखी बरेच जणांना संधी मिळणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही. BJP leader Girish Mahajan Development of State will be Strong BJP Leader Pankaja Munde
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST