Chitra Wagh Criticizes Sanjay Raut: सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा; चित्रा वाघ यांचे ताशेरे - संजय राऊत यांना लाज बाळगण्याचा सल्ला
अहमदनगर: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाज बाळगायला हवी. 'खोटं बोल पण रेटून बोल' असा फंडा सर्वज्ञानी संजय राऊत यांचा आहे. त्यांनी एका प्रकरणातील पीडित मुलीचा फोटो व्हायरल केला, ही चुकच आहे आणि गुन्हादेखील आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. राज्य महिला आयोग आयोगाच्या कानावरती ही बातमी गेली किंवा नाही हे ठाऊक नाही. नोटीस पाठवायचे धारिष्ट महिला आयोग करणार आहे का? की या नोटीस फक्त आम्हाला पाठवण्यासाठी आहेत, असा प्रश्न भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अहमदनगर येथे केला आहे.
पीडितेचा फोटो ट्विट केला त्यात काय चुकले? संजय राऊत यांनी पीडितेचा फोटो ट्विट केल्यानंतर चांगलेच राजकारण तापले, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, पीडितेचा फोटो ट्विट केला त्यात काय चुकले. एकीकडे चुंबन प्रकरणासाठी SIT स्थापन होते. मात्र, पीडित मुलीचा फोटो ट्विट केला तर गुन्हा ठरतो का? मी चूक केलेली नाही असे त्यांनी म्हटले. त्यावर बोलताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. त्या आज अहमदनगरमध्ये आल्या होत्या.
राऊतांना जीभ आहे का? सरकार वर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोणाच्या कोठ्यावर नाचतेय असे संजय राऊत म्हणाले. त्यावर बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरायला त्यांना जीभ आहे का? असा प्रतिप्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. गेल्या अडीच वर्षांमध्ये हाडा-मासांच्या मुलींवरती अत्याचार झाले. मुलींना जिवंत जाळण्यात आले हे संजय राऊत विसरून गेले. कोरोना काळामध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलांवरती बलात्कार झाले, विनयभंग झाले. एवढेच नाही ते विसरून गेले की, कशा पद्धतीने दिल्लीमध्ये निर्भयाची घटना घडली. तशीच घटना मुंबईमध्ये घडली आणि आणि त्याच्यामुळे त्यांनी एवढी अक्कल पाजळण्याची आवश्यकता नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.
हे शिंदे सरकार: हे शिंदे फडणवीस सरकार आहे. महिलांसाठी सक्षम रीतीने काम करणारे आमचे सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये भयमुक्त आणि भीती मुक्त वातावरणाची निर्मिती झालेली आहे. या सात महिन्याच्या कारकीर्दीमध्ये दोन डझन होऊन जास्त पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करायचे काम हे आमच्या शिंदे फडणवीस सरकारने केलेले आहे. त्यामुळेच संजय राऊतांच्या सगळ्या पुड्या सोडून झाल्यात असे चित्रा वाघ म्हणाल्या.
संजय राऊत सदैव चर्चेत:संजय राऊतया ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. मात्र, आता चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर थोडी तरी लाज बाळगा, असा आरोप केल्याने संजय राऊत आता काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Zakir Naik: झाकीर नाईकच्या मुसक्या आवळणार..? ओमानमधून हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू