महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

10 Kg Samosa बड्डे आहे भावाचा अन् जल्लोष साऱ्या गावाचा, 10 किलोचा समोसा कापून केला साजरा! - 10 किलोचा समोसा

By

Published : Nov 20, 2022, 9:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

मेरठ समोसे कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे विचित्र वाटते. मात्र हे खरे आहे! मेरठमध्ये एका कुटुंबाने 10 किलोचा समोसा कापून वाढदिवस साजरा केला. birthday Celebrated by cutting 10 kg Samosa. नोएडा येथील रहिवासी असलेल्या या कुटुंबाने मेरठमध्ये महाबाहुबली समोसा ऑर्डर केला होता. 10 Kg Samosa. समोसे बनवणाऱ्या दुकानदाराने सर्वांना खुले आव्हान दिले आहे की, जो 51 मिनिटांत दहा किलो समोसा खाईल त्याला 71 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. यापूर्वी येथे आठ किलो समोसे बनवले जात होते. खाणाऱ्यास 51 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. या चॅलेंजनंतर दुकानदाराला संपूर्ण भारतातून फोन आले. पण, एवढा मोठा समोसा कोणीही एकत्र खाऊ शकला नाही. आता 10 किलो समोसा खाण्याचे खुले आव्हान कौशल स्वीट्सने दिले आहे. या महाकाय समोशाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्याची तयारी सुरू आहे. या दहा किलो समोशाची किंमत 1500 रुपये आहे. कौशल स्वीट्सचे मालक शुभम कौशल यांनी सांगितले की, 10 किलो समोसा बनवण्यासाठी सुमारे 6 तास लागले. समोसे तळायला आणि पुरण तयार करायला जास्त वेळ लागतो. हा समोसा कढईत तुपात टाकून इतर २ कारागीर वरून सतत गरम तेल ओतत होते. या 10 किलो समोशामध्ये, 4 किलो बटाटा मसाला भरला आहे. त्यात मटार, पनीर, काजू, मनुका यांचाही समावेश करण्यात आला आहे. 10 kg Samosa in Meerut
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details