महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bike Rider Beaten : हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून महिलेसह दोघांनी बाईकस्वाराला चोपले; पाहा CCTV - bike rider

By

Published : Oct 27, 2022, 8:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबई सानपाडा ( Navi Mumbai Sanpada ) येथे हॉर्न वाजवल्याच्या शुल्लक कारणावरून एका बाईकस्वाराला तिघांनी रस्त्यात पाडून जबर मारहाण ( Bike rider severely beaten ) केली. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या तिघांमध्ये एका महिलेचाही ( woman is also included in three assaulters ) समावेश आहे. गौरेश चिखलीकर हे आपल्या मेहुणीला भेटण्यासाठी सानपाडा सेक्टर 19 मधील क्षितिज सोसायटीच्या दिशेने चालले होते. रस्त्यावरून जात असताना मोराज सोसायटीसमोरील रस्त्यावर उभी असलेली टाटा नेक्सन कारला रस्त्यात उभी असल्या कारणाने गौरेश यांनी आपल्या बाईकचा हॉर्न वाजवून रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. दोन ते तीनदा हॉर्न वाजवल्यानंतर गौरेश तिथून साईड देऊन निघून गेले. मात्र हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून टाटा नेक्सन कार मधील तिघांनी गौरेश यांचा पाठलाग करत क्षितिज सोसायटी समोरील रस्त्यावर त्यांना गाठले. त्यानंतर दोन व्यक्ती आणि एक महिला कार मधून खाली उतरली आणि या तिघांनी गौरश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details