Bike Rally of Government Employees: जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांची बाईक रॅली - Bike Rally of Government Employees
जालना - अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषीत पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज बुधवार (दि. 21 सप्टेंबर)रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गांधी चमण येथून ही बाईक राॅली काढण्यात आली होती. चमण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॉली निघाली होती. (Bike Rally of Government Employees) यामध्ये महिला कर्मचारीही मोठ्याप्रमाणात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली आहेत. नव्या सरकारने लवकरात लवकर जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा काढून असा इशारा या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST