Bacchu Kadu on Vajra Muth Sabha : वज्र मूठ कधी तुटेल हे सांगता येत नाही, बच्चू कडू यांचे मोठे विधान - बच्चू कडू यांचे मोठे विधान
बुलडाणा मुंबईतली सभा ही अखेरची ठरेल यावर बच्चू कडू यांनी आपले मत सांगितले. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले की, ही वज्र मूठ कधी तुटेल हे सांगता येत नाही. आज चांगले रस्ते झाल्यामुळे आणि वाहन उपलब्ध असल्यामुळे लोक सभेला येतात. पण कोणता नेता उद्या कुठे राहील हे सांगणे अवघड आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना ज्या मागील दिवसापासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे त्याला कुठे पुष्टी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आपण लवकरच सत्तेत असू आणि आपली कामं आता ५० टक्के नाही तर १०० टक्के पूर्ण होतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कामगार मेळावा काल मुंबईत पार पडला. याला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी मनसेचा सध्या एक आमदार आहे आणि ते महायुतीत आले. तर सत्ता येऊ शकते, असे सूचक वक्तव्यदेखील केले.