महाराष्ट्र

maharashtra

Bhiwandi Fire

ETV Bharat / videos

Bhiwandi Fire : भिवंडीतील डाईंग फॅक्टरीला भीषण आग; पहा व्हिडिओ - dyeing factory in bhiwandi

By ANI

Published : Oct 25, 2023, 8:01 AM IST

भिवंडी Bhiwandi Fire : भिवंडी शहरातील महाराष्ट्र डाईंग फॅक्टरीला मंगळवारी रात्री उशिरा आग लागल्याचं समोर आलंय. याप्रकरणी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचा संशय आहे. या आगीचा भिवंडीतील फिरदोस मशिदीच्या मागे असलेल्या कारखान्याच्या आवारातून उद्रेक झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच ही आग काही वेळातच जवळच्या इमारतीत पसरली. आगीची माहिती मिळताच निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पोलीस पथकासह तर दोन अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी निजामपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळं लागली हे मात्र समजू शकले नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानं झालंय.

ABOUT THE AUTHOR

...view details