पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 व्या शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी; पाहा व्हिडिओ - इंग्रज आणि पेशवे
Published : Jan 1, 2024, 12:07 PM IST
पुणे Bhima Koregaon 206th Shaurya Din :पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 व्या शौर्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. दरवर्षी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी येत असतात. यंदाही पहाटेपासूनच येथे अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी होत असल्याचं बघायला मिळतंय. तसंच भीमा कोरेगाव परिसरातील गर्दीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांची नजर आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीनं प्रशासनाकडूनही योग्य ती तयारी करण्यात आलीय. दरम्यान, भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी 1818 ला इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेलं युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धात दलित समाजातील सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळं इंग्रजांना विजय मिळवता आला. त्या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ उभारला. त्यावर युद्धामध्ये धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली. तेव्हापासून या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो.