Bhim organization aggressive : महापुरुषांबाबतच्या वक्तव्यावरून भीम संघटना आक्रमक; महामार्गावरच्या टोलनाक्यावर आंदोलन - Bhim organization aggressive over statements
भोर, वेल्हा हवेली तालुक्यातल्या भीमसैनिकांचे पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन Protest at Khed Shivapur toll booth करून टोल नाक्यावरची टोल वसुली बंद Toll collection stopped at toll booths केली आहे. पाटला विरोधात भीम संघटनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. भाजप आमदार आणि पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावरून पुण्यातल्या भोर, वेल्हा, हवेली तालुक्यातल्या भीम संघटना आक्रमक Bhim organization aggressive झाल्यात. या तालुक्यातल्या भीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत खेड शिवापूर टोल नाक्यावरची टोल वसुली बंद पाडत आंदोलन केले. भीम सैनिकांकडून जोरदार घोषणा बाजी करण्यात आली आहे. राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाऊराव पाटील आणि आंबेडकर यांच्या विषयी शिक्षण संस्थेला भीक मागून चालवल्या या वक्तव्यावर आता सर्व क्षेत्रातून निषेध होत आहे कालच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST