महाराष्ट्र

maharashtra

आरोपींना अटक

ETV Bharat / videos

बीड जाळपोळ आणि दगडफेक प्रकरण; 'या' प्रमुख आरोपींसह 262 जणांना घेतलं ताब्यात - पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 5:09 PM IST

बीड Beed Crime News : बीडमधील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील (Stone Pelting Case In Beed) प्रमुख आरोपी पप्पू शिंदेसह 262 जणांना ताब्यात घेण्यात बीड पोलिसांना (Beed Police) यश आलं आहे. तर जवळपास 300 आरोपींची ओळख पटलेली असून यामध्ये आणखी चार प्रमुख आरोपी आहेत. तर या ओळख पटलेल्या आरोपींना पकडण्यासाठी 12 पथकं काम करत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 2000 जणांची चौकशी करण्यात आलीय. विशेष म्हणजे जे फरार आरोपी होते आणि ज्यांना आता अटक केली आहे, अशांना कोणी मदत केली आहे? याची देखील चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (Nand Kumar Thakur) यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details