Bear Attack : बापरे! अस्वल आला दुचाकीस्वारावर धावून!, पुढे झाले असे काही..पहा थरारक व्हिडिओ - युवकावर अस्वलाचा हल्ला
बुलढाणा तालुक्यात एक युवक अस्वलाच्या ह ल्ल्यातून थोडक्यात बचावला. तालुक्यातील डोंगर खंडाळा येथे पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकावर अस्वलाने अचानक हल्ला केला. अस्वल त्या युवकाच्या दुचाकीवरच धडकले. दरम्यान, आजुबाजूच्या लोकांनी आरडाओरड करून त्या युवकाला सावध केले. लोकांच्या आरडा ओरडा मुळे अस्वल विरुद्ध दिशेला वळाले व शेतात नाहीसे झाले. या घटनेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. अस्वलाच्या हल्याने घाबरून दुचाकीस्वार खाली पडला होता. मात्र त्याने त्वरित सुरक्षित स्थळी धाव घेतली. त्यामुळे तो बचावला. बुलढाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथे 12 जून रोजी पहाटे साडे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पाठीमागून येणाऱ्या व्यक्तीने या संपूर्ण घटनेला कॅमेऱ्यात कैद केले आहे. पहा या घटनेचा हा थरारक व्हिडिओ..