महाराष्ट्र

maharashtra

बसवराज बोम्मई

ETV Bharat / videos

Karnataka Elections: पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, बसवराज बोम्मई यांची प्रतिक्रिया - Basavaraj Bommai

By

Published : May 13, 2023, 7:15 PM IST

बंगळुरु (कर्नाटक) : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत झालेला पराभव स्वीकारला आहे. या संपुर्ण पराभवाची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. तसेच, आगामी काळात जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू असे म्हणत 2024 ला लोकसभेत आमचा विजय होई अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ते म्हणाले की काँग्रेसची निवडणूक रणनीती हे त्यांच्या विजयाचे एक प्रमुख कारण आहे. आज मी माझ्या पदाचा राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार असल्याचेही बोम्मई यांनी यावेळी सांगितले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला 136 जागेवर विजयी होत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, भाजप 65 जागा विजयी होत पराभूत झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details