Sawant On PM Modi नरेंद्र मोदींना बाळासाहेब ठाकरेंनीच वाचवलं; अरविंद सावंतांकडून आठवण - balasaheb thackeray has saved
पुणे क्रिकेटर रवींद्र जडेजानं दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. आता गुजरातींनी एक गोष्ट समजून घेण्याची वेळ आली आहे.'नरेंद्र मोदींचे सरकार गुजरातमधून गेले, तर गुजरात गेले असे बाळासाहेब या भाषणात म्हणाले होते. तोच व्हिडीओ रवींद्र जडेजाने शेअर केला आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. याचाच धागा पकडत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलं आहे. नर्मदा आंदोलनाच्या वेळेस नरेंद्र मोदी एकटेच उपोषणाला बसले होते. त्यावेळेस भाजपचं कोणीही गेलं नव्हतं. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं की, नरेंद्र मोदी हे उपोषणाला बसले आहेत तुम्ही तिकडे जाऊन या त्यावेळेस उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते. त्यामुळे आता ते किती खोटं बोलत आहेत ते समोर येत आहे. मोदींचा फोटो लावला म्हणून जिंकून आले असं ते म्हणतात. मात्र 1995 साली कोणाचा फोटो लावून जिंकून आलात, असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी सभा घेतल्यामुळे सत्ता आली होती. यांच्या मुंबई आणि पुण्यामध्ये साध्या शाखा देखील नव्हत्या. आज यांचे फाईव्ह स्टार कार्यालय झाले आहेत, हे कुठून आलेत हे ईडीलाच विचारायला पाहिजे. असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST