उद्धव ठाकरेंचं शिवसेनाप्रमुखांना ११ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन, पहा व्हिडिओ - MP Priyanka Chaturvedi
Published : Nov 17, 2023, 1:50 PM IST
मुंबईBalasaheb Thackeray Commemoration : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी स्मृतीस्थळावर झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही कुटुंबासह बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीस्थळावर अभिवादन केलय. तसंच उद्धव ठाकरे यांनी स्मारकस्थळी उपस्थित शिवसैनिकांची संवाद साधला. आज सकाळपासूनच शिवतीर्थावर दर्शनासाठी शिवसैनिकांच्या रांगा लागल्या आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खासदार अनिल देसाई देखील स्मृतीस्थळावर उपस्थित होते. राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय.