Baba Ramdev Garba : बाबा रामदेव यांनी गरबा करत वाजविला ढोल, पहा व्हिडिओ - Bhajan singer Geetaben Rebari
हरिद्वार, तुम्ही योगगुरू बाबा रामदेव यांना योगा करताना नक्कीच पाहिलं असेल. पण, आज ईटीव्ही भारत तुम्हाला बाबा रामदेव हे ढोल वाजवताना आणि गरबा करताना दाखवणार आहे. योगगुरू बाबा रामदेव पहिल्यांदाच एका कार्यक्रमात डान्स करताना दिसले आहेत. सध्या पतंजलीमध्ये संन्यास दीक्षा महोत्सव सुरू आहे. सोहळ्याच्या पाचव्या दिवशी सनातन संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारतीय संस्कृतीतील प्रसिद्ध लोकगायिका गीताबेन रेवारी यांनी भजन सादर केले. पतंजली योगपीठात सुरू असलेल्या संन्यास दीक्षा महोत्सवात गीताबेन रेवारी यांनी आपल्या भजनातून सर्वांना गरबा करायला भाग पाडले. पतंजलीशी संबंधित सर्व माता - भगिनी गीताबेन रेवारींच्या भजनावर नाचताना दिसल्या. यावेळी योगगुरू बाबा रामदेवही स्वत:ला रोखू शकले नाहीत. तेही गीताबेन रेवारीच्या भजनाने इतके खूश झाले की त्यांनी स्टेजवर चढून ढोल वाजवायला सुरुवात केली. या दरम्यान बाबा रामदेव यांनी गरबाही केला.