पुण्यात मुसळधार पावसाने बाबा भिडे पूल पाण्याखाली - bridge under water due to heavy rain in Pune
पुणे - राज्यात अनेक ठिकाणी आठवडाभर चांगला पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे शहरात मध्यरात्री पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून 30 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील बाबा भिडे पुल हा पाण्याखाली गेला (Baba Bhide bridge under water). पुण्यातील मुळा मुठा नदी काठातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील बाबा भिडे पुलाच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी घेतलेला आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST