महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पोलिस कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी डान्सचा व्हिडिओ व्हायरल - Indian Independence Day

By

Published : Aug 15, 2022, 3:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

मथुरा संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. सगळीकडे लोक स्वातंत्र्याच्या जल्लोषात मग्न झालेले दिसतात. त्याचबरोबर मथुरा जिल्ह्यातील गोविंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीसही या सेलिब्रेशनमध्ये मागे नाहीत. पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलिसांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर चित्रपट गीतांवर नृत्य केले. यावेळी सर्व पोलीस स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवात रंगलेले दिसले. हातात तिरंगा झेंडा घेऊन देशभक्तीपर चित्रपट गाण्यांवर नाचणाऱ्या पोलीसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले पोलिस कसे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. ईटीव्ही भारत या व्हिडिओला दुजोरा देत नाही. हेही पाहा बरेलीत स्वातंत्र्य दिनाचा मदरशांमध्ये उत्साह तिरंगा फडकवून राष्ट्रगीत गाऊन मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details