महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aurangabad Accident औरंगाबादजवळ टँकर उलटला, नागरिकांची गोडेतेल नेण्यासाठी झुंबड - तेल जमा केल्याची माहिती

By

Published : Nov 24, 2022, 6:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

Aurangabad Accident औरंगाबाद धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ बायपासजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मंगळवारी गोडे तेलाचा टँकर उलटला. टँकर उलटल्याची माहिती आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचली आणि लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत कुणी डबा, तर कुणी ड्रमसह इतर भांडी घेऊन फुकटचे तेल मिळवण्यासाठी घटनास्थळी पोहोचून एकच झुंबड उडाली. यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. आजूबाजूच्या हॉटेलच्या लोकांनी सुद्धा ड्रम भरून हे तेल जमा केल्याची माहिती मिळते. मात्र हे गोडे तेल असलं तरी रिफाईड नाही आहे. यातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे कोणीही हे तेल खाऊ नये, अशा पद्धतीचा आवाहन प्रशासनाने केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details