मांढरदेव गडावरील काळूबाईच्या मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ - मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न
सातारा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेवी गडावरील Mandhardev Fort काळूबाईच्या मंदिरातील Kalubai temple दानपेटी फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दानपेटी फोडताना चोरट्याने तोंडाला आणि अंगाला काळे कापड गुंडाळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यापुर्वी देखील चोरट्यांनी देवीचे चांदीचे मुकुट आणि पाय चोरून नेले आहेत. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच पुन्हा दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याने मांढरदेव परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात wai police station अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST