Narhari Zirwal : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेऊन धरला संबळवर ठेका; व्हिडीओ व्हायरल
नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांचा पत्नीला खांद्यावर घेऊन संबळ डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी परदेश दौरा केला तेव्हा, जो मराठमोळा पेहराव केला होता. त्याचीही चर्चा झाली होती. आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी पत्नीला खांद्यावर घेऊन संबळ वाजवले आणि डान्सही केला. सध्या लग्नसराईची धूम सुरू असल्याने विवाह सोहळे अगदी दणक्यात सुरू आहेत. लग्न म्हटले की, कुटुंबांमध्ये मोठा उत्साह असतो. लग्न सोहळ्याआधी हळदी समारंभ पार पडतो. या हळदी समारंभात त्यांनी डान्स केला आहे. नरहरी झिरवळ हे दोन महिन्यापूर्वी पत्नीसह जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा धोतर, सदरा, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात ते होते. तर पत्नी नऊवारी लुगडे, कपाळाला कुंकू लावले होते. झिरवळ दाम्पत्याच्या जपानमधल्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता या व्हायरल व्हिडीओमुळे या दोघांची पुन्हा चर्चा होते आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही होत आहे.