घरात घुसून शेजाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - undefined
ठाणे : घराच्या बांधकामावरून दोन शेजारी पक्के वैरी झाल्याची ( Assault on Neighbor with Sharp Weapon ) घटना समोर आली आहे. एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे. महेंद्र देसाईकर (वय ३२) येसुबाई देसाईकर(वाय ५०) पिंकी मिरकुटे (वय ३०) अपर्णा देसाईकर (वय ३२) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर शेजाऱ्यांची नावे आहेत. विशेष माणिक मुरकुटे (वय ३२) असे गंभीर जखमी झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST