राहुल नार्वेकरांच्या निकालाची उद्धव ठाकरेंच्या जनता न्यायालयात चिरफाड, निकाल सोप्या भाषेत जाणून घ्या - Rahul Narvekar
Published : Jan 16, 2024, 6:33 PM IST
मुंबई Asim Sarode :कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकरांच्या आमदार अपात्रतेबाबतच्या निकालाची पोलखोल केली आहे. पक्षांतर कसं करायचं याबद्दलची बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा हा निर्णय आहे, असं असीम सरोदे म्हणाले. 10 जानेवारीचा निर्णय लक्षात घेणं आणि त्याचं विश्लेषण करणं खूप जास्त आवश्यक आहे. याद्वारे आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे दिसू शकतं असं असीम सरोदे म्हणाले. अपात्रतेबद्दलच्या सुनावणीचा कायदा, त्याबाबत झालेलं न्याय आणि अन्याय याचं विश्लेषण करण्याचा अधिकार आपल्याला आहे. यामुळे कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही. सध्या कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे, अशी टीका असीम सरोदेंनी केली. तसंच या घटनेमुळे जनतेचं मोठ्या प्रमाणात कायदेविषयक प्रबोधन झालं, अशीही कोपरखळी त्यांनी मारली. जाणून घ्या निकाल सोप्या भाषेत.