महाराष्ट्र

maharashtra

संपादित छायाचित्र

ETV Bharat / videos

Asian Games २०२३ : 'गोल्डन बॉय' निरज चोप्रा या वर्षीही करणार 'सुवर्ण' कामगिरी, काकानं व्यक्त केला आशावाद - निरज चोप्राचे काका

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 9:44 AM IST

पानिपत : Asian Games २०२३ :एशियन गेम 2023 मध्ये भारताचा गोल्डन बॉय निरज चोप्रा सहभागी होत आहे. त्यामुळे निरज चोप्राकडून या वर्षीदेखील सुवर्ण पदकाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 2018 मध्ये जकार्तात झालेल्या एशियन गेममध्ये निरज चोप्रानं भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. यावेळी निरज चोप्रानं भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याची दावा केला आहे. आता 4 ऑक्टोबरला निरज चोप्रा एशियन गेममध्ये भाला फेकणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा निरज चोप्रा भारताला सुवर्ण पदक जिंकून देणार असल्याचा आशावाद त्याच्या काकानं व्यक्त केला आहे.  

पुन्हा जिंकणार सुवर्ण पदक : निरज चोप्राचे काका भीम चोप्रा यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी 'दोन दिवसापूर्वी निरज चोप्रासोबत माझं बोलणं झालं आहे. एशियन गेमसाठी निरज चोप्रा पूर्णपणानं तयार असल्याचं त्यानं आपल्याला सांगितलं आहे. यावेळीही निरज चोप्रा भारताला सुवर्ण पदक मिळवून देणार आहे. निरज चोप्रा पूर्ण ताकदीनं तयारी करत आहे. सुवर्ण पदक जिंकण्याची परंपरा यावर्षीही निरज चोप्रा कायम राखणार आहे', असं भीम चोप्रा यांनी सांगितलं आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details