Maharashtra Political Crisis: आदळ आपट करण्यापेक्षा निकालाचे स्वागत करावे, खोतकर यांचा विरोधकांना सल्ला - निकालाचे स्वागत करावे
जालना: राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात पार पडला. निकालानंतर अनेक राजकिय नेते प्रतिक्रिया देत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून आज ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. कोर्टाच्या निर्णयानंतर जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला.आज कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून, 16 आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे दिला आहे. त्याचबरोबर शिंदे सरकारला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. निकाल शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे हा आनंदाचा क्षण असून विरोधकांनी आता आदळ आपट करण्यापेक्षा, निकालाचे स्वागत करावे असे खोतकर यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी: तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. तसेच राज्यपालांच्या कृतीवरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या सर्व विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत.