Passport for dogs to travel abroad: काय सांगता? कुत्र्यांना परदेशात नेण्यासाठी मिळाला पासपोर्ट - वाराणसी मुंशी घाट पर जया
वाराणसी (उत्तर प्रदेश) : लोकांना अभ्यास करण्यासाठी आणि परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आता रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनाही परदेशात जाता येणार आहे. वाराणसीत पहिल्यांदाच 2 रस्त्यावरचे कुत्रे परदेशात जाणार आहेत. त्यासाठी त्यांचा पासपोर्टही तयार करण्यात आला आहे. त्यांना नेदरलँड आणि इटलीच्या नागरिकांनी दत्तक घेतले आहे. काशीचे 2 स्ट्रीट डॉग 'मोती' आणि 'जया' इटली आणि नेदरलँडला जाणार आहेत. इटलीची वीरा लाझारेटी मोती आणि नेदरलँडची मिरेल बोंटेन बेल जयाला दत्तक घेत आहेत. दोन्ही रस्त्यावरील कुत्र्यांना विमानाने नेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत दोघांना विमानतळावर नेण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या कुत्र्यांच्या पासपोर्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी डिजिटल प्रक्रियेचाही अवलंब करण्यात आला आहे.