महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Andheri East ByElection अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये निरुत्साह ? - morning session discouragement

By

Published : Nov 3, 2022, 10:02 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी Andheri East ByElection मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी सात वाजल्यापासून आतापर्यंत २ तास होत आले आहेत. यादरम्यान मतदानामध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. विशेष करून ही निवडणूक एकतर्फी होत असल्याने या निवडणुकीमध्ये मतदार किती प्रमाणात मतदानाला बाहेर पडतील हे सुद्धा बघणे गरजेचे आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल BJP candidate Murji Patel यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्या कारणाने उद्धव ठाकरे गटाच्या Uddhav Thackeray group उमेदवार ऋतुजा लटके Candidate Rituja Latke यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी झाली असली तरी त्यांच्या विरोधात असलेल्या सहा उमेदवारांपैकी चार अपक्ष उमेदवार आहेत. तर दोन छोट्या पक्षाचे उमेदवार आहेत. या सर्व कारणासाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत असून ज्या पद्धतीचे मतदान व्हायला पाहिजे त्या पद्धतीने मतदान होणे थोडे कठीण दिसत आहे. ज्या मतदान केंद्रावर स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या मतदान करणार आहेत, त्या मतदान केंद्रावर जास्त प्रमाणात मतदार आलेले सध्या तरी दिसत नाही आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details