Bageshwar Baba in Mumbai बागेश्वर बाबा यांच्या विरोधात मुंबईत तक्रार, अंनिसचे श्याम मानव म्हणाले, पोलिसांनी कारवाई न केल्यास.. - shyam manav
मुंबई : बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा मुंबईत कार्यक्रम होणार आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबांविरोधात मीरा रोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या वेळी पोलिसांनी कारवाई न केल्यास समिती उच्च न्यायालयात जाणार आहे, असे समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात मीरा रोड पोलिस ठाण्यात जादूटोणा अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अंधश्रद्धा पसरवणारे आणि संत तुकाराम महाराजांचा अपमान करणारे बाबा बागेश्वर यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. बाबांच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल होऊन त्यांच्या भावना आणि विश्वासाशी खेळल्या जाईल, असे श्याम मानव यांनी म्हटले आहे. 18 व 19 मार्चला मीरा रोड येथे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.