महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Anant Radhika Engagement Video : अनंत अंबानी-राधिकाचा एंगेजमेंट सोहळा; पाहा खास व्हिडिओ - राधिका एंगेजमेंट सोहळा

By

Published : Jan 20, 2023, 2:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

मुंबई: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिला या निवासस्थानी आज एंगेजमेंट सोहळा पार पडला आहे. कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या एंगेजमेंटमध्ये बॉलिवूड स्टार्सची खास उपस्थिती होती.उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लहान मुलगा अनंतच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रित केले होते.अनंत आणि राधिका मर्चंट त्यांच्या एंगेजमेंटमध्ये खूप सुंदर दिसत होते. अनंत निळ्या रंगाच्या पोशाखात तर राधिका गडद क्रीम रंगाच्या लेहेंग्यात दिसली. या एंगेजमेंट सोहळात कुटुंबीय, मित्रपरिवार सहभागी झाले होते. 

एंगेजमेंट सोहळात कुत्र्याची एन्ट्री : शाही सोहळा सुरू असताना अचानक एका कुत्र्याची एन्ट्री झाल्याने अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा कुत्रा अंबानी कुटुंबीयांचा पाळलेला कुत्रा आहे. अनंत अंबानी यांना प्राण्यांवर अतिशय प्रेम आहे.तर अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानीच करण्यात आला. या कार्यक्रमाला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. अनेकांच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला.

गुजराती परंपरा :  अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्यात गोलधना आणि चुनरी हे विधी पार पडले. गोलधनाचा अर्थ गुळ आणि धणे असा होतो. गुजराती परंपरेमध्ये साखरपुड्यावेळी या गोष्टींचा वापर केला जातो. या दोन्ही गोष्टी मुलाच्या घरी सर्व उपस्थितांमध्ये दिल्या जातात. तसंच मुलीचे कुटुंबीय मुलाच्या घरी भेटवस्तू आणि मिठाई घेऊन येतात. या विधीनंतर अंगठ्या एक्सचेंज केल्या जातात.

अनंत, राधिकाची अंगठ्याची देवाणघेवाण -बहीण ईशा अंबानीने रिंग सेरेमनी सुरू करण्याची घोषणा केली. यासोबतच अनंत, राधिकाने एकमेकांना अंगठी घातली. या प्रसंगी कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनंत, राधिका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. आजचा रंगीबेरंगी दिवे आणि फुग्यांनी सजवलेले अँटिलिया तत्पूर्वी, अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या व्यस्ततेसाठी अंबानी कुटुंबाकडून मोठ्या संख्येने पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. बॉलीवूड, बिझनेस जगतातील अनेक दिग्गजांनी या लग्न समारंभाला हजेरी लावली होती. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या एंगेजमेंट पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाचे निवासस्थान अँटिलिया फुलांनी, रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आले होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा -Surgery on Mahesh Bhatt : आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

Last Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details