आनंद महिंद्रांनी शिर्डीत घेतले साईसमाधीचे दर्शन - आनंद महिंद्रा शिर्डी भेट
Published : Dec 8, 2023, 6:38 PM IST
शिर्डी (अहमदनगर)Anand Mahindra Shirdi Visit : साईबाबांचे परमभक्त आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आज दुपारी 3 वाजता शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. (Mahindra And Mahindra Group Chairman) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचा सन्मान केला. यावेळी साई मंदिर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.
महिंद्रा कंपनीच्या 16 गाड्या साई संस्थानला भेट :महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची कुठलीही नवीन कार लॉन्च होण्याआधी महिंद्रा ग्रुप आपली पहिली कार साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात देत असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी महिंद्रा कंपनीची महिंद्रा एक्स यु व्ही सेव्हन हंड्रेड ही 22 लाख रुपयांची नवीन कार साईबाबा संस्थांनाला भेट स्वरूपात दिलीय. आतापर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने 16 गाड्या साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात देण्यात आल्यात. (Darshan of Sai Samadhi by Anand Mahindra)