
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरणात ETV भारत'वर मोठा खुलासा; पाहा व्हिडिओ - an eyewitness of Ankita Bhandari
डेहराडून (उत्तराखंड) - अंकिता भंडारी प्रकरणातील मुख्य साक्षीदारासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे. यामध्ये पुलकित आर्यने अंकिता भंडारीवर कसा अत्याचार केला आणि तिचे तोंड दाबून तिला आत नेले हे पाहिले आहे. (Ankita Bhandari Case) या दरम्यान, अंकिता भंडारी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. वनांतर रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे समोर आले आहे. या प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे की, अंकिता वाचवा-वाचवा अशी ओरडत होती. त्याचवेळी पुलकितने तीला तोंड दाबून आत नेले होते. ही घटना 18 सप्टेंबर रोजी रात्री घडली. त्याच दिवशी अंकिताचा खून झाला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST