महाराष्ट्र

maharashtra

Navneet Rana

ETV Bharat / videos

Navneet Rana Dance : आमदार रवी राणांच्या तालावर धरला नवनीत राणांनी ठेका - MP Navneet Rana went to Melghat and danced

By

Published : Mar 5, 2023, 7:49 PM IST

अमरावती :अमरावतीच्या लोकप्रिय असलेल्या खासदार नवनीत राणा त्यांच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण कृतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. दिवाळी, होळी यासह इतर सणासुदीच्या निमित्ताने त्या मेळघाटमध्ये नेहमी जात असतात. यावेळी तर त्यांनी चक्क आपल्या आमदार पतीच्या ठेक्यावर जोरदार फेर धरत आदिवासी बांधवांसोबत नृत्य केले.
 

होली के रंग-मेलघाट के आदिवासीयो के संग : सातपुडा पर्वताच्या रंगीत बसलेल्या मेळघाटात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या निमित्ताने बाहेरगावात गेलेले आदिवासी बांधव होळीसाठी आपल्या गावात परत येतात. तसेच होळीचा आठवडाभर आनंद घेत असतात. अशातच बडनेराचे आमदार, अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात जाऊन आदिवासी बांधव सोबत गाण्याच्या तालावर जोर धरत नृत्याचा आनंद लुटला. होली के रंग-मेलघाट के आदिवासीयो के संग, आमदार रवी राणा, खासदार नवनीत रवी राणा यांचा 5 दिवसीय मेळघाट होळी दौरा सुरू झाला असून, 5 दिवस राणा दाम्पत्य मेळघाटातील अतिदुर्गम गावात मुक्कामी राहणार आहे.

 

राणांमुळे आदिवाशी बांधवांची होळी गोड : खासदार नवनीत, रवी राणा यांच्या प्रयत्नांनी आदिवासींचे रोजगार हमी योजनेचे रखडलेले पैसे तात्काळ मिळणार असून त्यासाठी त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी श्रीमती पवणीत कौर यांच्यासोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे सुचविले. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे वचन दिल्याने आता आदिवासींना तातडीने मजुरीचे पैसे मिळणार असून त्यांची होळी आनंदात जाणार आहे. ऐन होळीच्या तोंडावर आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने आदिवासी चिंतीत होते. 

 

आदिवासीना होळीच्या शुभेच्छा :खासदार आमदार राणा दांपत्याने परंपरा, संस्कृती जोपासून गेल्या 12 वर्षांपासून आपली होळी आदिवासी बंधू-भगिनीसोबत साजरी करतात. मेळघाटातील धारणी तालुक्यातील हैद्रामल, चीचाटी, कालापाणी, सोलामु, बदनापूर, रामटेक,मलकापूर, वस्तपूर, सोमखेडा, माजरी आदी गावांमध्ये जाऊन गावागावात आदिवासीना होळीच्या शुभेच्छा दिल्या. आदिवासी युवकांना व्हॉलीबाल किट, कॅलेंडर आदींचे वाटप केले.

हेही वाचा -MLA Bachchu Kadu on Stray Dogs : राज्यातील सर्व भटक्या श्वानांना आसाममध्ये पाठवा; आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याने गदारोळ

ABOUT THE AUTHOR

...view details