महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amol Mitkari mimicry : अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंसह भाजपा नेत्यांची केली धमाल मिमिक्री

By

Published : Apr 20, 2022, 1:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपूर येथे पार पडलेल्या परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी ( Raj Thackeray mimicry by Amol Mitkari ) राज ठाकरेंसह भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांचा खाज ठाकरे, असा उल्लेख करत राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमैया यांची मिमिक्री मिटकरी ( Amol Mitkari mimicry news ) यांनी केली. राज ठाकरे यांच्याकडून अनेक नेत्यांची मिमिक्री आतापर्यंत पाहायला मिळत होती. राज ठाकरे यांची मिमिक्री फारसे कोणी करत नसल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, आणि किरीट सोमैया यांची केलेली मिमिक्री पाहून उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच दाद दिली. त्याचबरोबर, अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर हनुमान चालीसा मुद्द्यावरून टीका करताना भर सभेमध्ये हनुमान चालीसाचे पठण करत मनसे नेते राज ठाकरे यांना टोला लगावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details