वर्ध्याच्या दिव्यांग तरुणाला 'बिग बीं'नी दिली अविस्मरणीय भेट; पाहा स्पेशल रिपोर्ट - अमिताभ बच्चन यांनी व्हीलचेअर दिली
Published : Dec 1, 2023, 9:56 PM IST
|Updated : Dec 2, 2023, 3:54 PM IST
तळेगाव (वर्धा) Amitabh Bachchan Wheelchair : वर्धा जिल्ह्यातील तळेगावच्या श्रीदेव वानखेडे यांचं २०११ मध्ये एका दुर्दैवी कार अपघातात कमरेखालचं शरीर पांगळं झालं. त्यानंतर त्यांना व्हीलचेअर चिकटली ती कायमचीच. मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सहभागी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. अखेर २०१६ मध्ये त्यांना त्यात यश मिळालं. जेव्हा कौन बनेगा करोडपती शो आटोपून श्रीदेव वानखडे घरी परतले तेव्हा एके दिवशी अचानक एक भलं मोठं पार्सल त्यांच्या घरी आलं. या पार्सलमध्ये एक अत्याधुनिक व्हीलचेअर होती, जी स्वत: अमिताभ बच्चन यांनी त्यांना भेट दिली होती, सोबत त्यांच्या सहीचं पत्रही होतं. हे गिफ्ट पाहून श्रीदेव वानखेडे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या व्हील चेअरची अंदाजे किंमत १ ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या व्हीलचेअरमुळं आता श्रीदेव यांचं जीवन अत्यंत सुलभ झालं आहे.