महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ambadas Danve गजानन किर्तीकर यांना अजून काय द्यायला हवे होते - अंबादास दानवे यांची टीका - अंबादास दानवे यांची टीका

By

Published : Nov 13, 2022, 10:20 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

औरंगाबाद गजानन किर्तीकर Gajanan Kirtikar यांचा पक्ष वाढीत मोठा वाटा आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे जाणे सुखदायी दुर्दैवी आहे. म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असे आहे. पक्षाने आमदार, खासदार मंत्री केले, अजून काय द्यायला हवे होते, अस विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे Council Leader of Opposition Ambadas Danve यांनी मत व्यक्त केले. जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे Guardian Minister Sandipan Bhumre यांनी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला धमकावल्याचे तक्रार पोलिसात देण्यात आली. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. सहा वेळा आमदार, दोन वेळा मंत्री झाले आहेत. त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. पालकत्वाची भूमिका त्यांनी पार पाडावी. त्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी तसे केले असावे, अशी टीका दानवे यांनी केली. जनतेने स्वतःची ताकद ओळखावी, आत्तापर्यंत इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अशा नेत्यांना देखील जनतेने हरवले होते. त्यामुळे त्यांच्याकडे मताचा अधिकार असतो, तेव्हा दादागिरी केले तर त्याचे उत्तर मिळेल. त्यांनी त्यांचे काम करावे अशी टीका देखील दानवे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित तयार झालेल्या चित्रपटाबाबत वादविवाद समोर आले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड NCP leader Jitendra Awad यांनी प्रेक्षकाला मारहाण केल्याचे समोर आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. मात्र प्रेक्षकांचा यात दोष नसतो, त्यांना हा मारहाण करण चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details