Ambadas Danve Critisize मागच्या लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ, आता भाजपची दुसरी शाखा-अंबादास दानवेंचा मनसेला टोला - हनुमान चालिसा
गोंदिया राज ठाकरे हे मागच्या लोकसभेत भाजपला 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत होते. तीन- चार महिन्यांपूर्वी हेच राज ठाकरे मशिदीवरून भोंगे काढा असे म्हणत होते. मात्र, ते भोंगेही सुरू आहेत अन् हनुमान चालिसा एकाही भोंग्यासमोर म्हटल्या गेली नाही. ( Ambadas Danve Critisize ) राज ठाकरे त्यावेळेसच्या महाविकास आघाडी सरकार, शिवसेनेला विरोध करत होते. ( Ambadas Danve Critisize On Raj Thackeray ) आता भाजप त्याच राज ठाकरेंना मित्र बनवू पाहत आहे. कारण राज ठाकरेंची भाषा आणि वर्तन आहे, ते भाजपशी मिळते- जुळते असून भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणजे राज ठाकरे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुसंवाद बैठक येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेने तर राजकारण केले नाही. ज्यांना राजकारणाची खुमखुमी आहे. त्यांना शिवसेनेचा दसरा मेळाव्याला ( Dussehra gathering 2022 ) विरोध करणाऱ्याला आम्ही शिवतीर्थावरच उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आजपर्यंत जिथे झाला, तिथेच होणार, असेही ते म्हणाले. दरम्यान, गोंदिया येथील अत्याचार पिडित महिलेच्या कुटुंबीयांशी दानवे यांनी भेट घेऊन शासकीय योजनेमार्फत काही लाभ मिळावा, यासाठीदेखील प्रयत्न करू, असे सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST