महाराष्ट्र

maharashtra

फाईल फोटो

ETV Bharat / videos

Politics Over Ayodhya Visit : अयोध्या दौऱ्याचे राजकारण; विरोधकांची टीका तर सत्ताधाऱयांचे प्रत्युत्तर - ambadas danve on cm ayodhya visit

By

Published : Apr 9, 2023, 3:19 PM IST

छत्रपती संभाजीनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे अयोध्येला जाणे म्हणजे फार मोठी मर्दुमकी नाही. यांचे हात गद्दारीने बरबटलेले असून हा श्रीरामांचा अवमान आहे, असा हल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांवर चढविला आहे. सरकारच्या विरोधात बोलणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील दानवे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवले, अशी टीका काल गिरीष महाजन यांनी केली होती. या टिकेला देखील दानवे यांनी उत्तर दिले. बाबरी मस्जिद पडली, त्यावेळी भाजप नेत्यांनी शेपूट घातले होते. त्यामुळे महाजन हे ठाकरे यांच्यावर टीका करणारे कोण आहे? असा सवाल देखील त्यांनी केला. शिवाय महाजन यांच्या सर्टिफिकिटची आम्हाला गरज नाही.  आमचे 64 आमदार निवडून आले होते, अशी आठवण देखील अंबादास दानवे यांनी करून दिली. रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेल्यावर महाविकास आघाडीचे नेते टोमणे मारत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका भाजप नेते अतुल सावे यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे,  यासाठी बाळासाहेबांनी पूर्ण प्रयत्न करून पाठिंबा दिला होता. मात्र आज उद्धव यांनी यांच्या पक्षातील लोक विरोध करतायेत ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे सावे म्हणाले. स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली, अशा स्वातंत्र्यविराचा अपमान राहुल गांधी करतात. राहुल गांधी यांच्या विरोधात आणी सावरकर यांच्या समर्थनार्थ ही गौरव यात्रा गेल्या सहा दिवसापासून छत्रपती संभाजीनगरातील विविध मतदार संघात काढली होती. आम्हाला अभिमान आहे ही यात्रा हिंदूराष्ट्रांमध्ये पार पाडू शकलो, असे सावे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details