Ambadas Danve देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्यामागे अमित शाहंचा हात असू शकतो -अंबादास दानवे - फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्यामागे अमित शाहं
मुंबई विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी ईटीव्हीशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे. दानवे म्हणाले, ज्या लोकांनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला ते लोकं हिंदुत्वाविषयी बोलत आहेत. अमित शहांचा Amit Shah जसा या सर्व सत्तानाट्यामागे हात होता तसाच तो देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे यामागे देखील होता, अशी शंका आहे. दुसरा पक्ष फोडायचा आणि स्वत:चा पक्ष सत्तेत आणायचा, ज्या पक्षाबरोबर आपण राहिलो त्यालाच फोडायचं ही भारतीय जनता पक्षाची देशातील नीती आहे. जनता याला वेळेवर उत्तर देईल. गोवर आजराच्या प्रसारावर बोलताना दानवे म्हणाले, गोवर आजारावर राज्य सरकारने निश्चित पावलं उचलायला हवी. लंपी आजारावर देखील सरकारने असेच दुर्लक्ष केले त्यामुळे राज्यातील भरपूर गोधन नष्ट झाले. त्यामुळे दुधाचा प्रश्न राज्यभर निर्माण झाला. सरकारने याकडे आता लक्ष द्यायला हवे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST