Monsoon Session 2022 सरकारकडून दडपशाहीची वागणूक अंबादास दानवेंची भाजपवर टीका - Ambadas Danve Criticize BJP
आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनापूर्वी बोलताना विरोधी पक्षनेते, विधानपरिषद अंबादास दानवे Leader of Opposition Legislative Council यांनी सध्या चर्चेत असलेल्या मोहित कंबोज ट्विटवरून विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज हे ज्या पद्धतीने ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. भाजपच्या नेत्यांना या अगोदर त्याची कल्पना कशी लागते. हे आम्ही यापूर्वीसुद्धा वारंवार विचारत आहोत असे अंबादास दानवे बोलताना म्हणाले, पण त्याचे उत्तर अजून भेटले नाही. ही सरकारची दडपशाही आहे असेही विरोधी पक्षनेते, विधानपरिषद अंबादास दानवे Ambadas Danve Criticize BJP म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST