महाराष्ट्र

maharashtra

खासदार नवनीत राणा

ETV Bharat / videos

Navneet Rana ST Bus Travel: खासदार नवनीत राणांनी अमरावती ते वलगाव दहा किलोमीटर केला एसटी बसने प्रवास

By

Published : Jun 13, 2023, 8:24 PM IST

अमरावती:खासदार नवनीत राणा यांनी आज (मंगळवारी) अमरावती ते वलगाव असा दहा किलोमीटरचा प्रवास एसटी बसने केला. दुपारी बारा वाजता त्यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांना चिखलदऱ्याला जायचे असल्यामुळे वलगावपर्यंत एसटी बसद्वारे प्रवास केला. अमरावती जिल्ह्यात सोमवारी मेळघाटात घाटालगत एसटी बस दरीत कोसळली होती; या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नव्हती. या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी आज मध्यवर्ती बस स्थानक येथून परतवाडाकडे जाणाऱ्या बसमधून वलगाव पर्यंत प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्या वाहकाच्या सीटवर बसल्या. बसमधील प्रवाशांची देखील त्यांनी यावेळी संवाद साधला. वलगावला उतरल्यावर त्यांनी शासन आता इलेक्ट्रिक एसटी बस आणणार आहे. अमरावतीत मात्र इलेक्ट्रिक एसटी बस ऐवजी चांगल्या दर्जाच्या गाड्या द्याव्या अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे नवनीत राणा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. त्या आज चिखलदरा येथे स्कायवॉकच्या पाहणीसह विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमरावती बस स्थानक येथून वलगाव पर्यंत 10 किलोमीटरचा प्रवास त्यांनी एसटी बसने केला. वलगावला त्या एसटी बसमधून उतरल्या आणि पुढे परतवाडा आणि चिखलदरा पर्यंतच्या प्रवासाला त्या आपल्या खासगी वाहनाने निघून गेल्या.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details