VIDEO राज्यातील सर्व नाट्यगृहे आता लवकरच अत्याधुनिक होणार - Theaters in bad condition
मुंबई महाराष्ट्र पश्चिम बंगाल व दक्षिण भारत ही राज्य खास करून नाट्य चळवळीची परंपरा असलेले राज्य आहे. स्वातंत्र्यानंतर मात्र रवींद्र नाट्यमंदिर सारखे मुंबईतील प्रख्यात नाट्यगृह सोडले, तर राज्यातील इतर ठिकाणचे नाट्यगृहांची अवस्था अत्यंत बिकट Theaters in bad condition आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व नाट्यगृहांना मदत करीत अत्याधूनिक बनवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा इतर शासकीय संस्थेच्यावतीने ते चालवले जाते. मात्र, सोयी सुविधा अपुऱ्या आहे. कुठे रंगमंचासाठी उत्तम व्यवस्था नाही. तर अनेक ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठीची पुरेशी जागा नाही. त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar यांनी अशा नाट्यगृहांना आता शासन सहाय्य करेल आणि हे नाट्यगृह अत्याधुनिक सुसज्ज असे तयार केले जाईल असे म्हटले
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST