Chhatrapati Sambhajinagar Violence: छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात, सर्वांना शांतता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन - छत्रपती संभाजीनगर मधील घटना
मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसन जाळपोळ झाली. किराडपुरा भागात हिंसाचार झाला. पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सर्व धर्मियांचे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात होतात. आज रामनवमी आहे, सर्वांनी शांतता राखा आणि सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर मधील घटना दुदैवी आहे असही ते म्हणाले आहेत. पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. पहाटेची घटना असली तरी सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या ठिकाणी राम मंदिर असून आज रामनवमीनिमित्त मोठा उत्साह आहे. सर्वांनी त्यामुळे शांतता राखली पाहिजे. राज्यात सर्वधर्मीय एकत्र येऊन सगळे सण साजरे करतात. सर्व धर्मियांना माझे आवाहन आहे की आपण सर्वांनी शांतता राखावी. आज रामनवमी आहे आणि रमजान देखील आहे. त्यामुळे सर्वांनी शांततेत उत्सव साजरे करावेत ही विनंती असही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.